‘जीएसटी’संदर्भात प्रश्न-उत्तरे

शंका आणि समाधान
जीएसटी परिषदेच्या ४७ व्या बैठकीत सुचविण्यात आलेले दरांतील सर्व बदल १८ जुलै २०२२ पासून लागू झाले आहेत. असाच एक बदल म्हणजे नोंदणीकृत ब्रँड किंवा ब्रँड धारण करणार्या विशिष्ट वस्तूंवर जीएसटी आकारण्यापासून होत आहे. ज्या वस्तूंवर किंवा ब्रँडवर कायद्याच्या न्यायालयात कारवाईयोग्य दावा किंवा कायद्याच्या न्यायालयात अंमलबजावणी करण्यायोग्य अधिकार उपलब्ध आहे, अशा सीलबंद, लेबल लावलेल्या वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येईल.
या बदलाच्या एकंदर व्याप्तीबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी काही निवेदने प्राप्त झाली आहेत, विशेषत: कडधान्ये, पीठ, तृणधान्ये इत्यादी वस्तूंच्यासंदर्भात स्पष्टीकरण मागणारी निवेदने प्राप्त झाली आहेत. (दर शुल्काच्या अध्याय १ ते २१ च्या अंतर्गत येणार्या विशिष्ट वस्तूंच्या) संदर्भात, अधिसूचनेद्वा सूचित केल्याप्रमाणे. क्र. ६/२०२२-केंद्रीय कर (दर), दिनांक १३ जुलै २०२२ आणि SGST आणि IGST साठी संबंधित अधिसूचना.
१८ जुलै, २०२२ पासून लागू झालेल्या ‘सीलबंद आणि लेबल लावलेल्या’ वस्तूंवर जीएसटी आकारण्याबाबत काही शंका/प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वारंवार विचारले जाणा प्रश्न खालीलप्रमाणे आहेत :
n १८ जुलै २०२२ पासून सीलबंद केलेल्या आणि लेबल केलेल्या वस्तूंच्यासंदर्भात कोणता बदल करण्यात आला आहे?
१८ जुलै २०२२ पूर्वी, विशिष्ट वस्तू, ज्यांच्यासंदर्भात कायद्याच्या न्यायालयात कारवाई करण्यायोग्य दावा किंवा अंमलबजावणीयोग्य अधिकार उपलब्ध आहे, अशा वस्तू जेव्हा युनिट कंटेनरमध्ये ठेवल्या जात असत आणि नोंदणीकृत ब्रँडचे नाव किंवा ब्रँड धारण करीत तेव्हा त्यावर जीएसटी लागू केला जात होता. १८ जुलै २०२२ पासून या तरतुदीत बदल करण्यात आला आहे. कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यानुसार अशा सीलबंद केलेल्या आणि लेबल लावलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर जीएसटी लागू करण्यात आला आहे, पुढील प्रश्नांमध्ये तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, कडधान्ये, तांदूळ, गहू आणि पीठ (आटा) यांसारख्या तृणधान्यांवर (वर नमूद केल्याप्रमाणे) यापूर्वी ब्रँडेड आणि युनिट कंटेनरमध्ये पॅक केल्यावर ५% दराने जीएसटी लागू केला जात होता. १८ जुलै २०२२ पासून, सीलबंद केलेले आणि लेबल लावलेले असताना या वस्तूंवर GST लागू होईल. याव्यतिरिक्त, दही, लस्सी, तांदूळ अशा काही वस्तू. सीलबंद केलेल्या आणि लेबल लावलेल्या असतील तर त्यावर १८ जुलै २०२२ पासून ५% दराने जीएसटी लागू होईल. प्रामुख्याने हा बदल हा विशिष्ट ब्रँडेड वस्तूंवर, सीलबंद केलेल्या आणि लेबल लावलेल्या विशिष्ट वस्तूंवर जीएसटी आकारण्याच्या पद्धतींमधील केलेला बदल आहे.
– अशा प्रकारच्या पुरवठ्यावर नेमक्या कोणत्या टप्प्यात जीएसटी आकारला जाईल? म्हणजे कारखानदार किंवा उत्पादकाने घाऊक विक्रेत्याला वस्तू विकल्यावर ती वस्तू तो अंतिमतः किरकोळ विक्रेत्याला विकतो, अशा प्रसंगी विशिष्ट वस्तूंवर नेमक्या कोणत्या टप्प्यात जीएसटी आकारला जाईल? अशा वस्तूंचा पुरवठा कोणत्याही व्यक्तीने केल्यावर जीएसटी लागू होईल, म्हणजे वितरकाला पुरवठा करणारा कारखानदार किंवा किरकोळ विक्रेत्याला पुरवठा करणारा वितरक/मध्यस्थ किंवा वैयक्तिक ग्राहकांना पुरवठा करणारा किरकोळ विक्रेता अशा कोणत्याही व्यक्तीने पुरवठा केल्यास जीएसटी लागू होईल. त्यानंतर कारखानदार किंवा घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता जीएसटीमधील इनपुट टॅक्स क्रेडिट तरतुदींनुसार त्याच्या पुरवठादाराकडून आकारलेल्या जीएसटीवर इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी पात्र असेल. उलाढाल मर्यादा सवलत किंवा संयुक्त कर योजनेचा लाभ घेणारा पुरवठादार नेहमीच्या रीतीने, सवलत किंवा संयुक्त कर दरासाठी पात्र असेल.
– अशा पॅकेज केलेल्या वस्तू औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांच्या वापरासाठी पुरवल्या गेल्यास कर देय आहे का?
स्पष्टीकरण : कायदेशीर मेट्रोलॉजी (सीलबंद वस्तू) नियम, २०११ च्या अध्याय-II च्या नियम ३ (क) नुसार औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांच्या वापरासाठी सीलबंद केलेल्या वस्तूंचा पुरवठा कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आला आहे. म्हणून, जर अशा वस्तूंचा पुरवठा केला असेल तर वरील नियम ३ (क) अंतर्गत असलेल्या अपवादानुसार, जीएसटी आकारणीच्या उद्देशाने ते सीलबंद केलेले आणि लेबल लावलेले मानले जाणार नाही.
– किरकोळ विक्रेत्याने अशा वस्तू २५ किलो किंवा २५ लिटरपर्यंतच्या पॅकेजमध्ये खदी केल्या असतील, मात्र त्याने कोणत्याही कारणास्तव त्याच्या दुकानात त्या वस्तू त्याहून कमी प्रमाणात विकल्या तर कर भरावा लागेल का? जेव्हा अशा वस्तू सीलबंद आणि लेबल लावलेल्या स्वरुपात विकल्या जातात तेव्हा जीएसटी आकारला जातो. त्यामुळे ज्यावेळी वितरक किंवा कारखानदार किरकोळ विक्रेत्याला सीलबंद आणि लेबल लावलेल्या वस्तू विकतो, तेव्हा जीएसटी आकारला जाईल. मात्र कोणत्याही कारणाने किरकोळ विक्रेत्याने अशा प्रकारच्या पॅकेजमधून सुट्या स्वरुपात पदार्थांची विक्री केली तर किरकोळ विक्रेत्याकडून असा पुरवठा हा जीएसटी आकारणीच्या उद्देशाने पॅकेज केलेल्या वस्तूंचा पुरवठा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
– ‘क्ष’ ही व्यक्ती भात गिरणी चालविते आणि प्रत्येकी २० किलो तांदूळ भरलेली पॅकेट्स विकते. मात्र याबाबत कायदेशीर वजनमापेविषयक कायदे आणि त्याअंतर्गत येणा नियम यांच्यानुसार या विक्री व्यवहारांसंदर्भात आवश्यक घोषणापत्र जमा करत नाही. (या कायद्याखाली त्याने/तिने असे घोषणापत्र जमा करणे अनिवार्य असूनही) तर अशा परिस्थितीत या विक्री व्यवहारातील तांदळाची पॅकेट्स आधी सीलबंद करून नाव घालण्यात आलेली मानण्यात येऊन त्याविषयीच्या कायद्यानुसार वस्तू आणि सेवा कर भरण्यास पात्र असतील का? होय, अशी पॅकेट्स आधी सीलबंद करून नाव घालण्यात आलेला व्यापारी माल समजण्यात येईल आणि त्यावर वस्तू आणि सेवा कर लागू असेल. याचे कारण असे आहे, की अशा पॅकेट्सची माहिती कायदेशीर वजनमापेविषयक कायदे (सीलबंद व्यापारी माल) नियम, २०११ (नियम ६ अन्वये) जाहीर करणे बंधनकारक आहे. म्हणून भातगिरणीचालक ‘क्ष’ला अशा पॅकेट्सच्या विक्रीसाठी केलेल्या पुरवठा व्यवहारावर वस्तू आणि सेवा कर भरावा लागेल.