भावना गवळींचा व्हिप सेनेच्या सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा…

नवी दिल्ली : (MP Rahul Shevale On Press Conference) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता कार्यकर्ते आणि त्यानंतर खासदारांनी देखील बंड पुकारलं आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेचे लोकसभेतील नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी १२ खासदारांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली.
राहुल शेवाळे म्हणाले की, आम्ही २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीतून निवडून आलो आहोत. शेवाळे यांनी २०१९ च्या निवडणुकीतला वचननामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये काहीच झालं नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेना पाठिंबा देत, आमच्या गटाच्या प्रतोद खासदार भावना गवळी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भावना गवळी याच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद असून त्यांचा व्हिप हा सर्व 18 खासदारांना लागू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले.