इतरताज्या बातम्यादेश - विदेश

चक्रीवादळाचा गुजरातमध्ये हाहाःकार; वादळ नेमकं कुठं? वाचा सविस्तर..

Cyclone Biparjoy Live Updates : अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. यासाठी प्रशासनाची सगळी यंत्रणा कामाला लागली असून जवान नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे. या चक्रीवादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. चक्रीवादळाची लाईव्ह मूव्ह तुम्ही बातमीच्या शेवटी बघू शकता.

गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १७ टीम एसडीआरएफच्या १२ टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. तसेच नौसेनेचे ४ जहाजं तैनात करण्यात आलेले. यासह खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्याजवळच्या ७४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुजरात आणि महाराष्ट्रासह ९ राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसून शकतो. या ९ राज्यांमध्ये लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये