ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

मराठवाड्याला पावसानं झोडपलं, हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली

नांदेड | Marathwada Rain – सध्या राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात कालपासून (8 जुलै) पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरश: हाहाकार घातला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पाऊसामुळं हजारो हेक्टरावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.तसंच अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरलं असून गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. 

दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही  शेतकऱ्यांची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये