ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“जातीतून इतिहास पाहण्याचं…”, ‘वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

कुडाळ | Raj Thackeray – गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत असलेल्या चित्रपटांवरून आणि त्यातील ऐतिहासिक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. यामध्ये ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. “याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो आहे. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरं असल्याचं सांगितलं,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे. ठराविक मुठभर लोकच असं करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं सहा जणांची नावं टाकली. मग कोणीतरी बोललं ही सहा नावं नाहीत, तर ही सहा नावं आहेत. गंमत बघा मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे,” असं राज ठाकरे म्हणाले.

“मी मध्यंतरी गजानन मेहंदळे यांची भेट घेतली. त्यांना मी विचारलं की, वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावं सांगत आहे, तर कोणी ती नावं सांगत आहेत. यावर तुमचं म्हणणं काय? मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत”, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये