इतरक्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी व्यक्त केली खास इच्छा; म्हणाले…

मुंबई | Raj Thackeray – आज (24 एप्रिल) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 50 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर संपूर्ण जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांसोबतच त्याला अनेक कलाकारांनी आणि दिग्गज नेतेमंडळींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही त्यांच्या लाडक्या मित्राला सचिनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सचिनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच यावेळी त्यांनी एक इच्छादेखील व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची आणि एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा सचिन तू पूर्ण करशीलच.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये