भाजपच्या मोफत अयोध्यावारीवर मनसे अध्यक्षांची ‘ठाकरी’ तोफ; शहांनी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ खातं उघडलं

मुंबई : (Raj Thackeray On Amit Shah) मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात सध्या सभांचा धडाका चालू आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि राम मंदिर निर्माण, कलम 370 हटवणे यासह राष्ट्रीय मुद्द्यांवर जनतेला संबोधित केले. मात्र, त्यांचे एक वक्तव्य सध्या त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे.
यावेळी शाह म्हणाले, ‘भाजपचे सरकार आले कर सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचे एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ’. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरी शैलीत टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स अस नवीन खातं उघडलं असेल. कुणी काय काम केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आमिष कशाला दाखवता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परीस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यात घाणेरडी परिस्थिती आहे. मतदार येणाऱ्या निवडणुकीत काय करणार आहेत हे पाहावं लागेल. उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहीजे. राज्याची स्थिती संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. सध्याच चित्र सरळ दिसत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.