ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणे

‘भाजपने जसा उमदेपणा दाखवला तोच कसबा, चिंचवड मध्ये दाखवावा’; राज ठाकरेंचं आवाहन

मुंबई : (Raj Thackeray On – Kasba, Chinchwad Byelection) एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी लागू झालेली पोटनिवडणूक बिनविरोध लढवायची ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामध्ये उमेदवार निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील असेल तेव्हा तर त्याविरोधात उमेदवार उभा करूच नये. असे मत व्यक्त करत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हावी असे आवाहन केले आहे. (Raj Thackeray on Kasba And Chinchwad Byelection)

एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून देणे ही निधन झालेल्या व्यक्तीसाठी एकप्रकारे आपण श्रध्दांजलीच देत असतो. असं भावनिक आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. त्याठिकाणी शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले होते. तेव्हा भाजपला आवाहन केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवार मागे घेतला होता. आता कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्ति उभी असेल तर तिला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. भाजपने अंधेरी पूर्व मध्ये जो उमदेपणा दाखवला तोच याठिकाणी विरोधकांनी दाखवला पाहिजे. असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

कसबा चिंचवड बिनविरोध होईल का?

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर बिनविरोध होईल का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. महाविकास आघाडीने निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मात्र उमेदवार अजून घोषित केलेला नाही. आणि भाजपने दोन्ही ठिकाणी उमेदवार घोषित केले आहेत. चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसबामध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबाला उमेदवारी टाळण्यात आली आहे. त्याजागी हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील उमेदवार उभा असेल तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. अशात कसबा मध्ये मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला उमेदवारी टाळण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी विरोधकांकडून उमेदवार उभा करतीलच अशी शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये