देश - विदेश

सत्तांतरानंतर राज ठाकरेंचे पहिलेच भाषण; महाविकास आघाडीसह शिंदे सरकारवरही निशाना

मुंबई – Raj Thackerey : मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन महिन्यांनी मुंबईमध्ये आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण केले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतारावर तसेच सध्या सुरु असलेल्या राजकारणावर त्यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांची शस्त्रक्रिया झाल्यांनतर पहिल्यांदाच त्यांनी भाषण केले आहे. भाषणात त्यांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वाक्तव्यावारही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘राजकारण हा खूप गंभीर विषय आहे मात्र, सध्याच्या राजकारण्यांनी त्याला खेळाचा दर्जा दिला आहे’ अशी टीका त्यांनी यावेळी राज्यातील राजकारणावर केली आहे. नेते पक्ष बदलतात तरी, मतदार त्यांना मतदान कसेकाय करू शकतात? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना राज ठाकरे यानी शिवसेनेच्या भूमिकेवरही निशाना साधला. ‘उद्धव ठाकरे केंद्रात एका कार्यक्रमात असताना त्यांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी ओब्जेक्शन नाही घेतलं. मात्र निवडणूकीनंतर अडीच वर्षे आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या म्हणून मागणी केली.’ असा खुलासा राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरूनही सरकारवर मिश्कील टीका केली. राज्यातील नेते या पक्षातून त्या पक्षात उद्या मारतात. राजकारण एवढा गंभीर विषय असताना त्याला दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला तसा खेळाचा दर्जा राजकारणाला या नेत्यांनी दिला आहे. काय तर म्हणे मंगळागौरला खेळाचा दर्जा. खरं तर आता एखाद्याने लग्न केल्याबरोबर त्याला हार घालून खेळाचा दर्जा द्यायला पाहिजे” असा टोला राज ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर लगावला आहे.

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राज ठाकरे यांनी समर्थन दिले आहे. ‘हे लोक आमच्या देविदेवातांना शिव्या घालतात तेव्हा त्यांच्यावर काही कारवाई नाही होत. आम्ही काही बोललो की कारवाई केली जाते हा भेदभाव कशासाठी?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.

“माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, चिन्ह असलं काय नसलं काय, माझ्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. तेवढा मी श्रीमंत आहे. मी शिवसेना सोडताना बाळासाहेबांना बोलून सोडली” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी भाषणात बोलताना शिवसेनेतील फुटीवर दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये