रत्नागिरीत उदय सामंतांसमोर राजन साळवींचं तगडं आव्हान, ठाकरेंचा प्लॅन तयार?
रत्नागिरी : (Rajan Salve On Uday Samant) शिवसेनेविरुध्द बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झालेल्या मंत्री उदय सामंत यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकांना आणखी दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र, त्या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या मंत्री सामंत यांच्या संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात त्यांना होम पिचवर राजन साळवांच्या रुपानं तगडं आव्हान देण्याचा प्लॅन शिवसेनेकडून केला जात आहे. त्यासंदर्भात चर्चा आणि चाचपणी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
राजन साळवी हे मुळचे रत्नागिरीतील आहेत. शिवसेनेच्या बांधणीत त्यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांचा दांडगा संपर्क आणि शिवसैनिकांची त्याच्यामागे असलेली फौज, त्यांनी संपर्काचे जाळं विनलं आहे. त्यामुळे येत्या काळात उदय सामंत विरुद्ध राजन साळवी असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.