राजमाता फाउंडेशनतर्फे साजरी केली गरीब कुटुंबासमवेत दिवाळी

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : राजमाता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती आपुलकीची आणि जाणिवेची भावना ठेवून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी मावळ तालुक्यातील काही पाड्यांवर जाऊन हातावर पोट असलेल्या कुटुंबाना मदतीचा आधार आणि दिवाळीची भेट म्हणून कपडे आणि फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यात मावळ प्रांतातील सटवाईवाडी, डोंगरवाडी, लष्करवाडी या पाड्यांवरती जाऊन तेथील कुटुंबाना मदत देऊन त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. ही संकल्पनेची मुहूर्तमेढ संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शक, सदस्या सौ. सुरेखा मारुती साळुंखे यांनी अस्तित्वात आणली.
राजमाता फाउंडेशनतर्फे महिला सबलीकरण, गरजूना अन्न – धान्य, फळे वाटप, रोजगार मेळावे, कौशल्य विकासोपयोगी उपक्रम, युवक व युवती यांसाठी करिअर गाइडन्स , आरोग्य शिबिरे असे समाजोपयोगी कार्य मोठ्या प्रमाणात केले जातात. सध्या हे कार्य नवी सांगवी पुणे व आसपासच्या परिसरात चालू आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याचे ध्येय असल्याचे या निमित्ताने सौ. सुरेखा साळुंखे यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशांत वानखेडे, तन्मय ताकवले, सिद्धेश लष्करे, लता कदम, वासंती घराळ, अंजली कुलकर्णी, सुनीता कुंजीर, विद्या भोंडवे, सुनीता वाडेकर, जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मारुती साळुंखे, सध्याचे अध्यक्ष श्री. विशाल मारुती साळुंखे. उपाध्यक्ष चि. अमर रत्नाकर शेळके व इतर पदस्थानी आभार मानले व शुभेच्छा दिल्या.