“मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | Rakhi Sawant – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranuat) भाजपकडून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी भाष्य केलं होतं. “तुम्हाला मथुरेत सर्व बॉलिवूड कलाकार हवे आहेत. उद्या राखी सावंतही (Rakhi Sawant) निवडून येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली होती. त्यावर आता अभिनेत्री राखी सावंतने खोचकरित्या प्रतिक्रिया दिली आहे.
पापराझीने राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली, “आज मी फार आनंदी आहे. मी खरंतर तुमच्यापासून सर्व गोष्टी फार गुप्त ठेवल्या होत्या. मी 2022 निवडणूक लढवणार आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) करणार होते. पण मी फार नशीबवान आहे की माझ्या हृदयाच्या फार जवळ असलेली ड्रीम गर्ल, माझी स्वीटहार्ट, बाॅलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मी निवडणूक लढवणार असल्याची बातमी जाहीर केली आहे”.
खरतर मोदीजी आणि अमित शाह माझ्याबद्दल बोलणार होते. पण मोदीजी असूदे किंवा हेमा मालिनी एकच गोष्ट आहे आणि मी स्मृती इराणी पार्ट 2 होणार आहे. मी निवडणूक लढवणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. होय, मी निवडणूक लढवणार आहे. तुम्ही सगळे मला साथ द्याल ना? धन्यवाद हेमा मालिनी जी, तुम्ही माझ्यासाठी इतके छान विधान केलं आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद, असं राखी सावंत म्हणाली.