महागाईमुळे राखी सावंतवर आली टोमॅटो पिकवण्याची वेळ; Video होतोय तुफान व्हायरल
मुंबई | टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीची झळ सगळ्यांनाच बसतेय. भाजीत टाकण्यासाठी एक किलो टोमॅटो घेण्यासाठी पण विचार करावा लागतोय. परंतु राखी सावंतने यावर तोडगा काढला आहे. टोमॅटो विकत घेण्यापेक्षा तिने आपल्या घरीच टोमॅटो पिकवण्याचे ठरवले आहे. एवढाच नाही तर राखी सावंतनं 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याची निन्जा टेक्निक शोधून काढली आहे. राखीचा एक धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राखी सावंत नेहमीच पापाराझींसमोर भन्नाट अवतारात येत असते. पापाराझी समोर आल्यानंतर राखीचा फुल एन्टरटेनिंग ड्रामा सुरू होतो. तिच्या या ड्रामाला सोशल मीडियावर पसंती मिळत असते. राखी कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या घडामोडींवर बोलत असते तर कधी तिच्या नुसत्या बडबडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. आता टोमॅटो महाग झाल्यानंतर राखीनं काहीतरी करणं हे अपेक्षितच आहे. तर राखीने यावेळी थेट टोमॅटोचं झाडच लावून टाकलं आहे.