“शतरंज के बादशाह’ फडणवीस …”; दानवेंचं विधानपरिषदेसाठीच्या नव्या डावाबाबत मोठं वक्तव्य!

औरंगाबाद – Raosaheb Danave on Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या यशामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची चाल उपयुक्त ठरली. आता विधान परिषदेच्या आखाड्यासाठी महाविकास आघाडीही आपली जोरदार तयारी करत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीसांच्या नव्या डावाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘शतरंज के बादशाह’ देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळी करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवलं. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. आता आम्ही वेगळा डाव टाकणार असल्याचं म्हणत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
दरम्यान, तिन्ही पक्षांना आमचा आधीचा डाव समजला आहे. ते आता त्याच रस्त्याने जातील मात्र आता आम्ही वेगळा मार्ग काढू आणि आमचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार जिंकून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.