ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीशेत -शिवार

“शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर हातातले आसूड ओढावेत” ठाकरेंच्या या वक्तव्यावर दानवेंचा पलटवार

संभाजीनगर (Raosaheb Danve on Uddhav Thackereys Sambhajinagar Visit): शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज संभाजीनगर भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच टीका टिपण्णी सुरु आहे. विरोधकांनी ठाकरेंना सत्ता गेल्यावर दौरा करायची आठवण झाली त्याआधी नाही झाली अशा प्रकारच्या टीका केल्या आहेत.

दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आम्ही कायम तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी सरकारच्या नामुष्कीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांवर हातातले आसूड ओढले पाहिजेत आणि जाब विचारला पाहिजे अशा कठोर शब्दांत टीका उद्धव ठाकरेंनी दौऱ्यादरम्यान केली. त्यांच्या या टीकेवर भाजपचे रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना काहीही केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तय्न्चाय्वर अगोदर आसूड ओढावेत.’ असा पलटवार रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. “उद्धव ठाकरे आता घराबाहेर पडले आहेत आणि दौरे करत आहेत याचे सगळे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायला हवे. सत्तेत असताना अडीच वर्षे उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नव्हते. राज्यातही फिरले नव्हते. राजा जोपर्यंत जनतेत जाणार नाही तोपर्यंत जनतेचे दुःख त्याला कळणार नाही. हे आम्ही त्यांना सांगितले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडले. तेव्हा जनतेत गेल्याशिवाय जनतेचे समर्थन मिळत नाही, हे ठाकरेंना समजले आहे. ते आणखी किती ठिकाणी दौरा करतील याबाबत कल्पना नाही. मात्र विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली बाब आहे.” असंही दानवे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये