ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चित्रा वाघ अडचणीत वाढ! महिला आयोगाचा अवमान केल्या प्रकरणी थेट कारवाई

मुंबई : (Rapali Chakankar On Chitra Wagh) मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद-चित्रा वाघ याच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण खुपच चिघळले आहे. गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना आयोगाची बदनामी केल्या प्रकरणी आणि जनतेची दिशाभूल केल्यामुळे नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत चाकणकर म्हणाल्या, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो. प्रसारमाध्यमांना चित्रा वाघ यांनी काल खोटी माहिती दिली. तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता उर्फी जावेद-चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर असा तिहेरी वाद रंगण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये