क्राईमताज्या बातम्यापुणे

धक्कादायक! शिवसेनेच्या माजी मंत्र्याने शासकीय विश्रामगृहात केला बलात्कार; पुण्यात गुन्हा दाखल

पुणे | सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणे वाढले आहे. यावेळी अशीच धक्कादायक घटना घडली आहे. चक्क एका लोकप्रतिनिधीनेच एका महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात (Pune Crime news) ही घटना घडली आहे. भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे (Uttam Khandare) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 37 वर्षीय महिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने केलेला नेमका आरोप काय ?

माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्या महिलेच्या मुलाचा उत्तम सांभाळ करतो, असं सांगितलं. त्यांनी महिलेला रेस्ट हाऊसमध्ये बोलवून घेतलं. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्याने बलात्कार केला. या सगळ्यात महिलेने मंत्र्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेला पूर्ण विवस्त्र केलं. त्यानंतर महिलेला पट्याने मारहाण केली.

अनैतिक संबंधातून महिला गर्भवती राहिली. त्यानंतर महिलेला मुलगा झाला. यात मुलाला सांभाळण्यासाठी मंत्र्याने महिलेला चेक दिला मात्र तो चेक बाऊंस झाला. हा संपूर्ण घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर मारुन टाकेन अशी धमकी महिलेला देण्यात आली होती. या सगळ्या प्रकाराला घाबरुन अनेक दिवस महिला गप्प होती. मात्र जीवाला जास्त धोका असल्याचं लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाता पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये