क्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

अभिनव बिंद्रांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

मुंबई | An Upcoming Film On The Life Of Abhinav Bindra – अभिनव बिंद्रा यांच्या बायोपिकची घोषणा होऊन पाच वर्षे झाली आहेत. तसंच हा चित्रपट रखडला असल्याची चर्चा देखील सुरू होती. मात्रा या चर्चांना आता अभिनेता हर्षवर्धन कपूरनं पूर्णविराम दिला आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले विजेते अभिनव बिंद्रा यांची भूमिका अभिनेता हर्षवर्धन कपूर साकारणार आहे.

यावेळी हर्षवर्धन कपूर म्हणाला, ‘मला वाटतं की तुम्ही माझ्या वडिलांना चित्रपटाबद्दल विचारलं पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेच उत्तम व्यक्ती आहे. कारण, तेच या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. आम्ही निश्चितपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचं चित्रीकरण करू’.

“चित्रपटासाठी खूप तयारी आवश्यक आहे. प्रामाणिकपणे सांगितलं तर थारच्या शूटिंगमध्ये आम्ही व्यस्त होतो. त्याच्या आधीच हा चित्रपट व्हायला हवा होता. आम्ही पुढे गेलो आणि मध्ये दोन चित्रपट बनवले. परंतु, अभिनव बिंद्रा यांची बायोपिक सुरू करू शकलो नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे’ असंही हर्षवर्धन कपूर म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये