Top 5ताज्या बातम्यापुणेस्टार्ट अप

स्टार्टअप : धनश्री पाठक यांचे पारंपरिक वेषाला पूरक ‘धनाज पैठणी’

सध्या लोक सर्वत्र वेस्टर्न पद्धतीचे कपडे वापरताना दिसतात. पार्टी असो, शॉपिंगला जायचे असो, फिरायला जायचे असो अशा वेळी अनेकदा आपल्या अंगावर वेस्टर्न पद्धतीचे कपडे असतात. मात्र, लग्नसमारंभ, पारंपरिक सण अशा वेळी बहुधा स्त्रिया पारंपरिक पद्धतीचे कपडे वापरतात. पण दररोज वेस्टर्न वापरत असल्याने अशा कार्यक्रमांसाठी स्त्रियांना पारंपरिक कपड्यांची तात्पुरती सोय करावी लागते. त्यावेळी मग काहीतरी असं उरतंच जे वेस्टर्न पद्धतीचं असतं आणि पारंपरिक कपड्यांवर ते घालावे लागते. मात्र यावर उत्तम पर्याय पुण्यातील धनश्री पाठक यांनी ‘धना’ज पैठणी’च्या माध्यमातून समोर आणला आहे.

धनश्री पाठक यांच्या ‘धना’ज पैठणी’ ने खास स्त्रियांसाठी बाजारात आणलेल्या पैठणीपासून तयार करण्यात येणार्‍या कापडी वस्तूंनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. कुर्ती मटेरियल, गोल्डन बुट्टीचा पैठणी दुपट्टा, पैठणी चप्पल, गालीचा, टेबल रनर्स, टी कोस्टर्स, की होल्डर्स असे पैठणीच्या वस्तूंचे विविध प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. वरील सर्व वस्तु त्या पैठणी कापडापासून घरीच तयार करतात. कोरोनानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर धनाज पैठणीच्या मास्कची चांगलीच क्रेझ वाढली होती. पैठणीपासून तयार केलेले मास्क लग्नसराईत लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले. मुंबई, सातारा, जळगाव, नाशिक, तेलंगणा, गुरगाव, बंगळुरू अशा विविध ठिकाणांहून त्यांच्या वस्तूंना मागणी आहे. त्यासाठी अंजनी व डी. टी. डी. सी. कुरियरचा धनश्री पाठक वापर करतात.

धनाज पैठणीच्या पर्सेसना भारतातच नाही, तर जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई, यू. एस. ए. या देशांमधील मराठी लोकांकडून खूप मागणी आहे. लॉकडाऊनच्या आधी दिवसाला त्या पन्नास पर्स बनवत असत. कुर्ती मटेरियल, गोल्डन बुट्टीचा पैठणी दुपट्टा, पैठणी चप्पल, गालिचा, टेबल रनर्स, टी कोस्टर्स, की होल्डर्स असे पैठणीच्या वस्तूंचे विविध प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. नारायण पेठमध्ये त्यांनी नवीनच शॉप सुरु केलं आहे. सोशल मीडिया आणि वेबसाइटवरूनदेखील त्या ऑर्डर स्वीकारतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये