ताज्या बातम्यामनोरंजन

विजय देवरकोंडासोबत लिव्ह इनमध्ये राहतीये रश्मिका मंदाना? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा; म्हणाली, “जास्त…”

मुंबई | Rashmika Mandanna – लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चांगलीच चर्चेत आहे. रश्मिकानं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तसंच तिनं तिच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. तसंच त्यांच्या अफेअरच्याही चर्चा सुरू आहेत. याबाबत आता रश्मिकानं स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

रश्मिकानं तिच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रश्मिकानं तिचा वाढदिवस विजय देवरकोंडासह एकाच घरात साजरा केला असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. तसंच ते दोघं एकमेकांना डेट करत असून ते एकत्र राहत असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. यासंदर्भातल्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अशातच रश्मिकानं एक ट्विट रिट्विट करत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

रश्मिकानं एक ट्विट रिट्विट करतं म्हटलं आहे की, “अय्यो…जास्त विचार करू नकोस बाबू.” त्यामुळे आता विजय आणि रश्मिकाच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये