ताज्या बातम्यामनोरंजन

नऊवारी साडी, नाकात नथनी… ‘चंद्रा’ गाण्यावर रश्मिका मंदानाची ठसकेबाज लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Rashmika Mandanna – नॅशनल क्रश (National Crush) असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. तसंच आता रश्मिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ (Chandra) या मराठी गाण्यावर ठसकेबाज लावणी केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

रश्मिका मंदानानं ‘झी चित्रगौरव पुरस्कार’ (Zee Chitra Gaurav) सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात ती ‘चंद्रा’ या लावणीवर थिरकताना दिसली. तिनं केलेल्या ठसकेबाज लावणीनं प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. रश्मिकाचा हा डान्स व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवर शेअर करण्यात आला आहे.

‘चंद्रा’ या गाण्यावर डान्स करताना रश्मिकानं मराठमोळा लूक केला होता. पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, नाकात नथनी आणि केसांमध्ये गजरा अशा मराठमोळ्या वेशात ती दिसली. तसंच रश्मिकानं सादर केलेल्या ठसकेबाज लावणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये