सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रतन टाटांचे ट्वीट; म्हणाले…

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदासंदर्भात सायरस मिस्त्री यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्वीट करत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि कायम ठेवलेल्या निकालाबद्दल कृतज्ञ असल्याचे म्हणत आजचा निकाल हे आपल्या न्यायव्यवस्थेची मूल्य प्रणाली आणि नैतिकता मजबूत करते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, टाटा समूहासोबतच्या वादाच्या संदर्भात न्यायाधीशांनी ही पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली. दरम्यान, या निकालानंतर रतन टाटा यांनी ट्वीट करत त्यांनी निकालाचे कौतूक करत आपण कृतज्ञ असल्याचे म्हटले आहे. पुनर्विलोकन याचिकेत कोणतेही कारण सापडले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर मिस्त्री यांच्यातर्फे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.