ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…तपास यंत्रणांच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करतात’; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करून, ईडी-सीबीआय अशा तपास यंत्रणांच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच या प्रकरणांमधील सौदे थायलंड आणि बँकॉकमध्ये होत असल्याचाही आरोप राऊतांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “अजून अनेक प्रकरणं समोर येतील. लोकांना ब्लॅकमेल करून, ईडीच्या, तपास यंत्रणेच्या धमक्या देऊन कोणी कोठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले हे देखील लवकरच समोर येईल. आधी इथं आरोप करायचे, दबाव आणायचा, ईडीच्या, सीबीआयच्या, तुरुंगात धमक्या द्यायच्या आणि मग सौदा करण्यासाठी थायलंड बँकॉकमध्ये व्यवस्था करायची, तिथं पैसे स्विकारायचे अशी अनेकांची अनेक प्रकरणं आता समोर येतील.”

“आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्हा सगळ्यांवर कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कंबरेखाली वार करायचे नाहीत असे संस्कार आहेत. आम्ही असे वार केले नाहीत. सुरुवात तुम्ही केली तरी आम्ही संयम बाळगतोय, पण धमक्या देऊन परदेशात पैसे कोण स्विकारत होतं हे देखील हळूहळू बाहेर येईल. आधी या प्रकरणाचा निकाल लागू द्या,” असं देखील संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, “पोलीस तपास करत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण भाजपा सरकार करतं त्याप्रमाणे राजकीय सुडापोटी केलेलं नाही. त्या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. भोसले नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी तक्रारदार आहेत. त्यांनी तक्रार दाखल केलीय. कोणी किती पैसे गोळा केले, पैसे गोळा करून काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये