Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रमुंबईशिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी; पाहा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोण ?

पुणे : डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी (Dr. Ravindra Dattatray Kulkarni) यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी (Mumbai University Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. सुरेश वामनगीर गोसावी (Savitribai Phule Pune University Chancellor Dr. Suresh Vamangeer Gosavi) यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस (Ramesh Bais) यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी (Dr. Ravindra Dattatray Kulkarni) व डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Vamangeer Gosavi) यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे (Dhanajay Ghanshyam Bhave) यांची डॉ. बाळासाहेब सावंत (Dr. Balasaheb Savant Konkan University) कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये