WPL Auction 2023 : स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स आरसीबीने 3.4 कोटी मोजून संघात घेतले
मुंबई | महिला प्रीमियर लीगचा लिलाव (WPL Auction 2023) आज मुंबईतील (Mumbai) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Center) सुरु झाला. आतापर्यंत सर्वाधिक किंमत भारताची बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने स्मृतीला 3.40 कोटी रुपये मोजून संघात घेतलं. आरसीबीला आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आरसीबीचा कर्णधार असतानाही त्याला विजेतेपद जिंकता आलेलं नाही. आता विराटचं हे स्वप्न स्मृती मानधना पूर्ण करणार आहे. स्मृती मानधनाशिवाय आरसीबीने न्यूझीलंडची सोफी डिवाइन, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी यांनाही घेतलं आहे. आरसीबीने संघात दिग्गज बॅटर आणि बॉलर घेतले आहेत.
आरसीबीने सोफीला (Sophie Devine) 50 लाखांच्या बेस प्राइजवर तर एलिस पेरीला (Ellyse Perry) 1.70 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं. भारताची गोलंदाज रेणुका सिंहला आरसीबीने 1.60 कोटी रुपयांना संघात घेतलं. लिलावात पहिल्या टप्प्यात आरसीबीने तीन दिग्गज महिला क्रिकेटर्सना संघात घेतलं तर दुसऱ्या टप्प्यातही रेणुका सिंहला घेतलंय.