ताज्या बातम्यारणधुमाळी

“आम्हाला कोणीही रोखू शकत नाही…”, एकनाथ शिंदे आक्रमक

गुवाहाटी | Eknath Shinde – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासहीत पक्षातील आमदारांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. उद्या (6 डिसेंबर) एकनाथ शिंदे आमदारांसहीत मुंबईसाठी रवाना होणार आहेत. त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदेंनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही श्रद्धेनं कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. सर्व आमदारांना एक वेगळा आनंद, समाधान मिळालं आहे. इथे कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केल्याचं तुम्ही पाहिलं का? सर्वजण मोकळेपणाने फिरत होते,” असं सांगत एकनाथ शिंदेंनी आरोप फेटाळून लावले.

“उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहोत. तसंच आमच्याकडे 50 लोकं असून बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. जी प्रक्रिया असेल त्यात आम्ही जिंकू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असतं. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये