इतरटेक गॅझेट

रेल्वे तिकीट बुक करणं झालं सोप्पं; ‘हा’ नवा अ‍ॅप लॉन्च

नवी दिल्ली : भारतामध्ये रेल्वे प्रवास हा सुखकर, जलद अन् किफायतशीर समजला जातो. लॉंग रुटचा प्रवास करायचा असेल तर प्रवाशी हमखास रेल्वेचा पर्याय निवडतात. रेल्वेकडूनही प्रवाशांना सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच एक भाग म्हणजे डिजीटल तिकीट.

सरकारकडून आयआरटीसीटी सारख्या अन् अनेक खासगी अ‍ॅपच्या माध्यमातून ई तिकीट खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र अनेक तांत्रीक अडचणींना नेहमीच प्रवाशांना सामोरे जावे लागते. म्हणूनच बाजारात आता आणखी एक नवीन अ‍ॅप लॉन्च झाला आहे. प्रवाशांना सर्व डिजीटल सुविधा पुरवण्याच्या दृष्टीकोनातून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

रेडरेल अ‍ॅप असं या अ‍ॅपचं नाव असून बिजनेस टॅक्नोलॉजी या कंपनीकडून हा अनोखा अ‍ॅप बनविण्यात आला आहे. हा अ‍ॅप स्थानिक भाषांत उपलब्ध असून रेडरेल युजर्स फ्रेन्डली बनविण्याकडे कंपीननं लक्ष दिल्याचं पहायला मिळत. यापूर्वीच खासगी बसेस क्षेत्रात काम करण्याचा प्रदिर्घ अनुभव पाठिशी असल्याने रेडरेल अ‍ॅपही प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास कंपनीकडून आता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये