शिवसेनेची ‘ऑफर’ धुडकणारे; संभाजीराजे असणार शिवसेना पुरस्कृत उमेदवार?
मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कडव्या शिवसैनिकालाच पाटवण्याचा इरादा केलेल्या होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच संभाजीराजेंना मतं देण्याची भूमिका घेतलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मात्र नमले आहेत. ठाकरेंच्या अटी धुडणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी शिवसेनेची असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घडामोडीमुळं राज्यसभेत मोदी सरकारविरोधात शिवसैनिकाला बळ देण्याची ठाकरें यांची व्यूहरचना सफसेल फेल झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या छुप्या खेळीमुळंच मुख्यमंत्री पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने बॅकफूट वर आले आहेत. परंतू राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील पवारांचं वजन पथ्यावर पडण्याचा विश्वास असलेले संभाजीराजे यांनी ठाकरेंचा प्रस्ताव स्वीकारली नाही. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेसोबत राहण्याची घोषणा पवार यांनी केली. त्यामुळं ठाकरे हे शिवसैनिकालाच संधी देणार असल्याचे मानले जात होते. परंतु, गेल्या चार दिवसांत बैठकांच्या सपाट्यानंतर अखेर ठाकरे हेच संभाजीराजेंना पुरस्कृत करण्यात राजी झाल्याचे दिसत आहे.