मायलेकींच्या प्रेमावर शिझानच्या आईने केलेल्या आरोपांनंतर तुनिषाच्या आईने ऐकवली तुनिषाची व्हाईस रेकाॅर्डिंग

मुंबई : Tunisha Sharma Suicide case तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने ‘अली बाबा-दास्तान ए काबुल’ (Ali baba dastan e kabul) या ती करत असलेल्या मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली. (Tunisha Sharma Mother Vanita Sharma Shares Voice recording Of Tunisha) त्या घटनेने सगळीकडे तिच्या आत्महत्येच्या चर्चा सुरु झाल्या. पोलसांनी लगेच या प्रकरणात तपास सुरु केला. दरम्यान, तुनिषाच्या आईने जेव्हा तुनिषाच्या आत्महत्येला तिचा सहकलाकार आणि प्रियकर शिझान खान (sheezan Khan) जबाबदार असल्याचा आरोप केला तेव्हापासून हे प्रकरण खूपच वाढलेलं पाहायला मिळालं. (Responding to the sheezans mother Tunisha Sharma Mother Vanita Sharma Shares Voice recording Of Tunisha)
तुनिषाची आई वनिता शर्माने शिझान खानवर (sheezan Khan) आरोप केल्यानंतर पोलिसांनी शिझानला लगेच ताब्यात घेतलं. सध्या तो कस्टडीमध्ये आहे. आज न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे. आणखी काही दिवस तो कस्टडीतच राहणार आहे. दरम्यान, शिझानच्या आईने (Sheezan Khan Mother) नुकतेच तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले होते.
“तुनिषाची आई तुनिशाला नीट सांभाळत नव्हती. तुनिषाला अनेकदा पैशांची अडचण असे. मात्र, तिची आई तिला पैसे देखील देत नव्हती.” असे आरोप शिझानच्या आईने केले आहेत. त्यावर आता तुन्सिहाच्या आईने एक कॉल रेकाॅर्डिंग समोर आणली आहे. ज्यामध्ये तुनिषा आणि तिची आई यांच्यात किती प्रेम होते हे समजू शकते.
वनिता शर्मा यांनी ऐकवलेल्या व्हाईस रेकाॅर्डिंगमध्ये तुनिषाने आपण आपल्या आईवर खूप प्रेम करत असल्याचं म्हटलं आहे . “आई तू माझ्यासाठी खूप काही केलेलं आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं तिने कॉलवर आईला म्हटलं आहे.” यासंबंधित कॉल रेकाॅर्डिंग वनिता यांनी एएन आय या वृत्तसंस्थेला ऐकवली आहे. बरोबरच, माझं आणि तुनिषा चं णात खूप प्रेमळ होतं, मी तुनिषाला मागच्या तीन महिन्यांत तीन लाख रुपये दिले असून माझे बँक स्टेटमेंट देखील तपासू शकता असंही वनिता यांनी म्हटलं आहे.