ताज्या बातम्यारणधुमाळी

फोन टॅपिंग प्रकरणात बोगस नावं वापरल्याचा खुलासा; संजय राऊतांऐवजी एस. रहाटे तर खडसेंऐवजी…

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चौकशीदरम्यान फोन टॅपिंग करताना बोगस नावं वापरल्याची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. फोन टॅपिंग करताना संजय राऊतांऐवजी एस. रहाटे आणि एकनाथ खडसेंऐवजी खडासने असा उल्लेख करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, बोगस नावं वापरताना या लोकांच्या नावांशी मिळत्या जुळत्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम 164 अंतर्गत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. या 6 जणांमध्ये त्यावेळच्या ACS होम आणि DY SP दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांपैकी जे डीवाय एसपी आहेत, जे त्यावेळी SID मध्ये कर्तव्यावर होते आणि त्यांना या फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन टॅपिंग करताना संजय राऊत आणि एकनाथ खडसेंच्या नावांऐवजी बोगस नावांचा वापर करण्यात आला होता. 

संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन ‘समाजविघातक घटक’ या नावाखाली टॅप होत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात एक पत्र समोर आलं होतं. गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहीलेल्या या पत्रात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन नंबर होते. मात्र त्यांच्या नावापुढे नावं न देता समाजविघातक घटक असं नमूद करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये