ताज्या बातम्यारणधुमाळी

“राणेंनी स्वत:सहीत पोरांना आवरतं घ्यावं कारण…”, रुपाली ठोंबरेंचा इशारा

मुंबई | Rupali Thombare On Narayan Rane And Rane Family – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांचे समर्थक, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी राणे पिता-पुत्रांवर निशाणा साधला. राणेंनी स्वत:सहीत पुत्रांना आवरतं घ्यावं असा सल्लाही ठोंबरेंनी दिला आहे.

“आरोप प्रत्यारोपांचा विषय निघाला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मुलं अनेक शब्द वापरतात. भाजपचा सुसंस्कृत राजकारणाचा वसा आहे. त्यांचे वडील स्वत: केंद्रात आहेत. भास्कर जाधवांवर टीका करताना त्यांनी जीभ अनेकदा घसरली आहे. कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे?” असा प्रश्न ठोंबरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “भाजप 2014 साली सब का साथ सब का विकास या घोषणसहीत सत्तेवर आलं होतं. मात्र कुटनिती आणि फक्त आरोप करणे हेच सुरु आहे. नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांमधून ईडी तसंच इतर यत्रणांचा दबाव टाकून स्वत:कडे घेतलं आहे,” असा टोला रुपाली ठोंबरेंनी भाजपला लगावला आहे.

पुढे ठोंबरे म्हणाल्या, “मुळात भास्कर जाधव यांचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल असं बोलणं यामधून त्यांचे संस्कार दिसतात. राणेंनासुद्धा जशाच्या तसे उत्तर देणारे आपल्या राजकारणात आहेत त्यांनाही म्हणतात सूक्ष्म, लघू, शिशू. दुसऱ्यावर टीका करताना जबाबदारीनं करावी. ती वैयक्तिक असता कामा नये. विकासावर, चुकलेल्या गोष्टींवर किंवा खरा भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर बोलावं. मात्र भाजपकडे सुसंस्कृतपणा होता तो अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत संपलेला आहे.”

“आता फक्त कुटनिती, एकमेकांना वाईट बोलणं, एकमेकांच्या बेडरुममध्ये काय चाललंय याबद्दल बोलणं. राणेंनी तर स्वत:सहीत पोरांना आवरतं घ्यावं कारण तो काळ गेला. भास्कर जाधव म्हणाले की तुम्हाला बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात. हिंदू धर्मानुसार जे धार्मिक आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे पाप इथे करणार ते इथेच फेडावं लागणार. याची दक्षात त्यांनी घ्यावी आम्ही नाही,” असा टोला देखील ठोंबरेंनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये