मोठी बातमी! बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

गुजरात | गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (30 जानेवारी) आसाराम बापूला (Asaram Bapu) एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यानंतर आज न्यायालयाने याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
2013 साली आसारामवर सुरतच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याचवेळी त्याचा मुलगा नारायण साईवर (Narayan Saai) याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामव्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी होत्या. मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.