“वादळ येत आहे…”, रितेशनं ‘पठाण’साठी केलं खास ट्विट
मुंबई | Pathaan – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपट आज (25 जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी शाहरूखचे चाहते चांगलेच आतूर झाले होते. तसंच सध्या संपूर्ण देशभरात पठाण (Pathaan) चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून (Pathaan Advanced Booking) 24 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवरील (Box Office) अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पठाण (Pathaan) चित्रपटाची उत्सुकता प्रत्येकालाच लागली होती. यामध्ये आता अभिनेता रितेश देशमुखलाही (Riteish Deshmukh) पठाणनं भूरळ घातली आहे. रितेशनं शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटासाठी एक खास ट्वीट केलं आहे. “वादळ येत आहे. तुमचा सीटबेल्ट घट्ट बांधा. खूप दिवसांची प्रतीक्षा करायला लावली. शाहरुख खान तुला खूप शुभेच्छा. मी पठाण चित्रपटाचं तिकीट आधीच बूक केलं आहे”, असं म्हणत रितेशनं ‘पठाण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.
दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) व अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसंच शाहरुखचा ‘पठाण’ पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.