ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी फोडायचं भाजपचं नवं टार्गेट; पवारांचा आरोप!

मुंबई : (Rohit Pawar On Ddevendra Fadnavis) जवळपास चार महिन्यापुर्वी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षविरोधात बंडखोरी करत पक्षावरच दावा ठोकला आहे. महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात पसरलेली शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने खिळखिळी झाली. सेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी आणि 18 पैकी 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला धुळीत मिसळण्याचे काम केले. हे सर्व काम भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केले असल्याचे अनेक विरोधकांनी केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रोहित यांनी नुकतीचं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी भाजपवर हे गंभीर आरोप केला आहे. तसंच त्यांनी अजित पवार यांच्यातल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना तुमच्या दोघांमध्ये तणाव आहे का?असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना पवार म्हणाले, “मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिलं तिकीट अजित पवार यांनी दिलं. मला आमदारकीचं तिकीटही त्यांनी दिलं. एवढंच काय माझं लग्नही अजित पवारांनीच जमवलं आहे. तुम्हाला जेव्हा प्रगती करायची असते, तेव्हा कुटुंबात तुम्ही स्पर्धा करू शकत नाही. आमचे प्रत्येकाचे ध्येय वेगळे आहे. “

कुटुंबातील संबंधितांना बोलताना पवार म्हणाले, “आमचं ध्येय वेगळे आहे. सुप्रियाताई यांचं टार्गेट लोकसभा आहे, अजितदादा राज्यात काम करतात आणि मी माझ्या मतदारसंघात. पण विरोधकांना आमचं कुटुंब फोडायचं आहे. विरोधकांना वाटतं की कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल. जसं त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, तसं शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष त्यांचं टार्गेट आहे. “

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये