ताज्या बातम्यामनोरंजन

‘काॅफी विथ करण 8’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पहिल्याच भागात ‘हा’ बाॅलिवूडचा सुपरस्टार लावणार हजेरी

मुंबई | Koffee With Karan 8 – बाॅलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा (Karan Johar) ‘काॅफी विथ करण’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोची चाहते अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. तसंच आता चाहत्यांची हीच प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. ‘काॅफी विथ करण 8’ (Koffee With Karan 8) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचं आठवं पर्व ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

‘काॅफी विथ करण’ या शोमध्ये अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. मागील पर्वातही अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे मागचं पर्व चांगलंच गाजलं होतं. तसंच या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित गुपितं उलगडत असतात. त्यामुळे चाहतेही हा शो पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

तसंच आता ‘कॉफी विथ करण’ या शोच्या आठव्या पर्वात एका पेक्षा एक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या शोच्या पहिल्याच भागात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या शोबाबत चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली असून ते आगामी पर्वाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये