ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

वाद झाला पण वाया नाही गेला… ‘बेशरम रंग’ गाण्याने रेकॉर्डच केला!

मुंबई : (Besharam song from Pathan movie is famous) गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख (Shahrukh Khan) आणि दीपिकाच्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Beshram Rang) या गाण्याने खुप धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांचा पठाण (Pathan) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं तेव्हा त्या गाण्यावरून खुप वाद निर्माण झाला होता. या गाण्यांमध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप अनेक हिंदू संघटना आणि राजकीय पक्षाने केला होता.

दरम्यान, त्यामुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही राजकीय नेत्यांनी तर या चित्रपटावर आणि गाण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिले. वादात अडकलेल्या या गाण्यामुळे ठिकाणी चित्रपटाचे पोस्टरही जाळले गेले इतकच नाही तर शाहरुखलाही जिंवत जाळण्याची धमकीही देण्यात आली. एवढे होवून देखील शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यानं कमाल केली आहे. त्यामुळे वाद झाला पण, वाया नाही गेली असं म्हणता येईल.

सोशल मीडियावर शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याने 10 दिवसांत 100 मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहे. इतकेच नव्हेतर तर या अनेक गाण्याने रेकॉर्ड मोडले आहे. झालं असं की एकीकडे गाण्याबाबत वाद सुरू आहे. तर दुसरीकडे, ‘बेशरम रंग’ने चक्क 100 मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत. या गानं गेल्या काही दिवसांपासून ट्रेण्डं करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये