रोहित शेट्टीला आवडतो निळू फुलेंचा ‘हा’ चित्रपट; म्हणाला, “मी अनेक मराठी चित्रपट पाहिले, पण मला…”

मुंबई | Rohit Shetty – बाॅलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच आता त्याचा लवकरच ‘स्कूल, काॅलेज आणि लाइफ’ हा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना आवर्जून घेत असतो. कारण चित्रपटांच्या कमाईत महाराष्ट्राचा 60 टक्के वाटा आहे, असं रोहित शेट्टीचं म्हणणं आहे. तसंच त्याने आता त्याचा पहिला मराठी चित्रपट बनवला आहे. ‘स्कूल, काॅलेज आणि लाइफ’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण परब मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत.
सध्या रोहित शेट्टी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसंच रोहितला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, तुझा आवडता मराठी चित्रपट कोणता? यावर रोहित म्हणाला की, “लहानपणी दूरदर्शन या चॅनेलवर शनिवारी आणि रविवारी मराठी आणि हिंदी चित्रपट लागायचे. त्यावेळी मी अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत. त्यामध्ये निळू फुलेंचा (Nilu Phule) ‘पिंजरा’ (Pinjra) हा चित्रपट माझा सर्वात आवडता चित्रपट होता.”