Top 5महाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“100 कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य!

मुंबई – kirit Somaiya on Anil Parab & CM | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती केली होती. सचिन वाझेकडून आलेला 100 कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता. अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो अब तेरा क्या होगा कालिया अनिल परब यांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरेंचीही झोप उडाली असेल, असं सोमय्या म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये