आरटीईच्या १९ हजार जागा रिक्त

संकेतस्थळावरील आकडेवारीवरून माहिती समोर
पुणे | शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण ८२ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे प्रक्रिया
– यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
– एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले.
– प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला.
– नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या.