बीडचा पॅरिसमध्ये डंका! अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 2024 साठी ऑलिम्पिकसाठी पात्र

Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याची 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केलं. अविनाशही ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी मेहनत घेत आहे.
अविनाश साबळेनं रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 8ः11ः63 वेळ नोंदवून सहावं स्थान पटकावलं आहे. आपलं नाव सहाव्या स्थानी नोंदवत अविनाश साबळे 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतसाठी पात्र ठरला आहे. त्यानं आठ मिनिटांत 11ः63 सेकंदांमध्ये पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीफलचेस स्पर्धेत अंतर गाठलं आहे आणि त्यातून त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळाली आहे. 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात पॅरिस या ठिकाणी होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातील अविनाश साबळे याने टोकिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022) देखील चांगी कामगिरी केली होती. रयाबीत डायमंड लीग स्पर्धेत त्याने 300 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 8ः12ः48 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता, तर अविनाशनं आत्तापर्यंत 9 वेळा स्वतःचाच रेकार्ड मोडला आहे. दुसऱ्यांदा अविनाश साबळे याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.