पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

सागरने १४ तास ४८ मि. पार केली इंग्लिश खाडी

अनेक विक्रम नावावर

पुण्यातील जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या १४ तास ४८ मिनिटांत जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (३४ किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात पार केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली होती. यातूनच अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्वीमिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला. मात्र, इंग्लिश खाडी सतत खुणावत होती. याबद्दल अनेकांकडून ऐकले होते. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यामधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. ही खाडी अत्यंत कमी तापमानात सर करणे मोठे आव्हानात्मक होते.

अखेर अवघ्या १४ तास ४८ मिनिटांत ही खाडी सर करण्यात यश मिळाले. इंग्लिश खाडी सर करण्याचे स्वप्न गेल्या काही वर्षांपासून पाहात होतो. लाटांचा चढउतार, वारे, थंडी असे अडथळे येत असतानाही ३४ किलोमीटरचे अंतर पार करण्यात यशस्वी झालो. आपण हे अंतर यशस्वी पार करू, असा आत्मविश्वास सुरुवातीपासूनच होता. हा खडतर जलप्रवास होता, असे यावेळी जलतरणपटू सागर कांबळे याने सांगितले. सागर हा पुण्यातील काळेवाडी येथे वास्तव्यास आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला जलतरणाचे वेड लागले. तेव्हापासून अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने चमकदार कामगिरी केली. २०१५ मध्ये चंदिगड येथे झालेल्या अखिल भारतीस आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने ४ बाय २०० मीटर रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत सागरने ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. २०१४ मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये