अर्थताज्या बातम्या

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यावर्षातही होऊ शकते पगारवाढ

Indin Economy – कोरोनानंतर (Corona Wave) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले. 2022 या वर्षाच्या शेवटी अनेक बड्या कंपन्यांनी मोठ्या संख्येनं कर्मचारी कपात केली. याचा परिणाम लक्षात घेता यावर्षात होणारी पगारवाढ समाधानकारक नसेल असाच अंदाज अनेकांनी बांधला होता. पण एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी अनेक भारतीय कंपन्या सरासरी किमान 9.8 टक्के इतरी पगारवाढ लागू करू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. 8 लाखांहून अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या 818 कंपन्या या सर्व्हेक्षणात सहभागी होत्या.

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी फक्त 6.8 च्या सरासरीत पगारवाढ केली होती. पण, (Corona Wave) कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अनेक कपन्यांमध्ये वेतनश्रेणीत सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून येत होते. एकीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेला ( Indin Economy ) या कंपन्यांकडून हातभार लावला जात असतानाच दुसरीकडे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात समाधानकारक वाढ करून कर्मचाऱ्यांनाही दिलासा दिला. या सर्व गोष्टींमुळे यंदाच्या वर्षीही पगारवाढ 9.8 टक्क्यांनी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मोठ्या हुद्द्यांवर काम करणाऱ्यांचा पगार अधिक प्रमाणात वाढेल असंही सांगण्यात आलं. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये