आरोग्यक्राईमपुणेमहाराष्ट्र

‘एक्‍सपायरी डेट’ उलटली तरी पदार्थांची विक्री

खडकवासला : उत्तमनगरमध्ये किराणा दुकानातून काशिनाथ धुमाळ यांनी इनोची खरेदी केली. परंतु त्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे त्या पाकिटावरची तारीख उलटून गेली होती, तरी देखील तशीच बिनधास्त विक्री सुरू होती. हा प्रकार उघडकीस आला तरी, किराणा दुकानात सर्रास विक्री चालूच होती. या प्रकाराबद्दल काशीनाथ धुमाळ यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी सावंत यांच्याकडे तक्रार केली. सावंत यांनी देखील तातडीने कारवाई केली. त्या दुकानदारांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करून पावती करण्यात आली.

काल घडलेल्या किराणा दुकानातील घटनेमुळे विश्वास उडाला आहे. त्यासंदर्भात किराणा दुकानदाराला समज दिली आहे, परंतु विभागातील नागरिकांची परत तक्रार आली तर दुकानावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच प्रशासनाने देखील अधूनमधून दुकानांना भेटी देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. ह्यासंदर्भात देखील अधिकार्यांशी चर्चा केली आहे त्यांनी कारवाई केल्याने समाधान आहे. नागरिकांनी देखील खरेदी बाबत सावधानता बाळगणे अनिवार्य आहे.
– काशिनाथ धुमाळ माजी उपसरपंच उत्तमनगर

‘एक्‍सपायरी डेट’ हा औषधी वापरामधील एक परवलीचा शब्द आहे. औषधांबरोबरच विविध खाद्यपदार्थ, सौन्दर्य प्रसाधने व रासायनिक पदार्थांच्या आवरणावर या दिनांकाचा उल्लेख असतो. कोणत्याही पदार्थाला ही डेट असतेच याचा अर्थ तो पदार्थ त्या तारखे नंतर वापरणे योग्य नाही. या पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन असे पदार्थ निष्क्रिय होऊ शकतात. आपण अनेकवेळा लहान मुलांना खाद्यपदार्थ आणण्यास पाठवतो परंतु हे करताना आणलेल्या वस्तूंची ‘एक्‍सपायरी डेट’ तपासून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आरोग्याला धोका आहे. ऑनलाईन खरेदी असो अथवा प्रत्यक्ष दुकानांमधून खरेदी असो खाद्यपदार्थाच्या उत्पादन दिनांकाची पडताळी करणे हे प्रत्येक ग्राहकाचे प्रथम कर्तव्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये