सलमानला चाहत्यांकडून मिळाली ‘ईदी’; सलग दुसऱ्या दिवशी ‘किसी का भाई किसी का जान’ची बक्कळ कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाने ईदच्या एक दिवस आधी शुक्रवारी चांगलीच ओपनिंग केली आहे. ईद आधीच प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी थोडा अडचणीत अडकला असला तरी चाहत्यांनी भाईजानचा मान राखला आहे. चित्रपटाच्या ओपनिंगला मॉर्निंग शोमध्ये 30 ते 40 टक्के सीटवर प्रेक्षक दिसले आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंग फारशी चांगली नसल्यामुळे चित्रपटगृहे नक्कीच रिकामी होती, मात्र स्पॉट बुकिंगचा फायदा चित्रपटाला झाला आहे. पहिल्या आणि दुसर्या दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमी केली आहे.
‘किसी का भाई किसी की जान’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
फरहाद सामजी (Farhad Samji) दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 15.81 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 25 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ईदची सुट्टी असल्याने सलमानच्या चाहत्यांची पाऊले ‘किसी का भाई किसी की जान’ पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळाल्याचं दिसून आलं आहे.
सिनेमातील हटके गाण्यांमुळे हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ‘मेरा कोई नाम नहीं है, लेकीन मैं भाईजान नामसे जाना जाता हूं’ असे डायलॉगने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईजानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यार कमबॅक केलं आहे. या सिनेमातील भाईजानच्या हटके लूकचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.