पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

परिस्थितीशी झुंज देत मिळवले यश : डॉ. चोरडिया

‘सूर्यभूषण २०२२’ पुरस्काराने गौरव

पुणे : पहिल्या केमोथेरपीवेळी माझी पहिली कंपनी सुरू केली. मला जोखीम घ्यायला आवडते. जोखमीशिवाय यश मिळत नाही, यावर माझा विश्वास आहे. जेव्हा परिस्थिती परीक्षा घेते तेव्हाच जिद्द निर्माण होते. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. अचानकपणे सौंदर्य स्पर्धांमध्ये उतरले आणि क्राऊन मिळाले. कर्करोगपीडित महिलेत काय ताकत असणार, असे म्हटले गेले तेव्हा पॉवर लिफ्टिंगला सुरुवात केली आणि दोनदा सुवर्णपदक पटकाविले, असे प्रतिपादन कर्करोगपीडित पहिल्या ‘मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्वीन २०१८’ डॉ. नमिता कोहोक यांनी केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन वर्ष सुरु होत असताना कोविड काळातील ऑनलाइन सवयींना छेद देत प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेण्याची सवय लागावी व त्यासाठीची एकाग्रता वाढावी म्हणून आयोजित ओरिएन्टेशन कार्यक्रमात डॉ. कोहोक बोलत होत्या. डॉ. कोहोक यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ‘मिसेस सूर्यदत्त २०२२’ व ‘सूर्यभूषण २०२२’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या वेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील उपस्थित होते.

“डॉ. नमिता यांची कहाणी फार प्रेरणादायी आहे. आपण लहानसहान गोष्टींना धरून बसतो व आपल्याला न करण्याचे कारणे सुचतात. डॉ. नमिता यांनी कायमच आव्हान स्वीकारत प्रतिकूल परिस्थितीत केलेली यशस्वी वाटचाल ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा जसा तुमच्या आयुष्याचा ठेवा आहे, तसेच ते ऐकून मिळालेली प्रेरणा आमच्यासाठीही उत्साहवर्धक ठरणार आहे. मुलांनी यातून शिकायला हवे व ठाम निश्चयाने आपलीही वाटचाल करायला हवी.”

-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

कोहोक म्हणाल्या, की रस्त्याने जाताना अनेकदा जोरजोरात सायरन ऐकू येतो. रुग्णवाहिकेला जाण्यास प्रथम जागा करून द्यावी. ‘मदर्स डे’ साजरा करतो. पण आईचा एक दिवस नसतो. तर आईमुळे आपला दिवस असतो.

“मिसेस इंडियासाठी रुग्णालयातील नर्सने माझा अर्ज भरला होता. अशी माणसे भेटल्याने मला त्या स्पर्धेत यश मिळाले. सामाजिक कामासाठीच्या सौंदर्य स्पर्धेत हॉंगकॉंग येथे गेले. पैठणी घालून रॅम्पवर चालल्यावर मला खास माझ्या पारंपरिक पोषाखासाठी ‘ग्लोरी ऑफ ट्रॅडिशन’ म्हणून नावाजले गेले. ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड’ अशी उपाधि घेऊन परत आले. या स्पर्धेत आम्ही सर्वच कॅन्सरपीडित होतो. प्रत्येकीनेच आपल्या शारिरीक, मानसिक अडचणींशी झगडा करत यश मिळविले आहे,” असे डॉ. कोहोक यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये