देश - विदेश

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा युरोपीय देशांची कान उघडणी केली; म्हणाले…

नवी दिल्ली : आम्हाला पण रशिया आणि युक्रेनचा संघर्ष तात्काळ संपवायचा आहे. मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संवादाचा आग्रह धरत आहोत. आम्ही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या गरजेवरही भर देतो, असे म्हणत भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांची कान उघडणी केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या रायसीना संवाद कार्यक्रमात त्यांनी युक्रेन संघर्षात भारताची भूमिका स्पष्ट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

रशिया आपल्या संपर्कात आहे. त्यापेक्षा जास्त युरोपमधील देशांशी संपर्कात आहे. लोकशाहीचा विचार केला तर गेल्या वर्षी अफगाणिस्तानात जे काही घडले ते सर्व लोकशाहीवादी देश पाहत होते. इंडो-पॅसिफिक प्रदेशात आमच्यासमोर असलेल्या आव्हानांवर कोणताही लोकशाही देश कुठे कृती करतो, असे नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री अनिकेन हुइटफेल्ड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले.

जेव्हा आशियामध्ये नियम-आधारित प्रणालीला आव्हान दिले जात होते तेव्हा आम्हाला युरोपमधून अधिक व्यवसाय करण्याचा सल्ला मिळाला. निदान आम्ही तुम्हाला तो सल्ला देत नाही आहोत. मुत्सद्देगिरी आणि संवादाकडे परत जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे. अफगाणिस्तानकडे पहा आणि कृपया मला सांगा की जगातील देशांनी कोणती न्याय्य नियमावर आधारित प्रणाली स्वीकारली आहे, असेही जयशंकर म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये