तेरा घर जाएगा इसमें!! एमसी स्टॅनला सानिया मिर्झानं दिलं खास गिफ्ट, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
मुंबई | Mc Stan – सध्या ‘बिग बाॅस 16’चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅन (Mc Stan) चांगलाच चर्चेत आहे. एमसी स्टॅनचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच भरपूर लोकांना एमसी स्टॅन आणि भारतीय टेनिसपटू सनिया मिर्झा (Sania Mirza) यांच्यातील नात्याबाबत माहिती नसेल. सानिया मिर्झा आणि स्टॅन यांच्यात खूप चांगलं नातं आहे. स्टॅन सानियाला आपली मोठी बहीण मानतो. तो तिला ‘आपा’ म्हणून हाक मारतो. तर आता सानियानं स्टॅनला एक खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
एमसी स्टॅननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्यानं सानिया मिर्झाचे आभार मानले आहेत. सानियानं एमसी स्टॅनला शूज आणि चष्मा गिफ्ट केला आहे. सानियानं दिलेल्या गिफ्टची किंमत लाखोंमध्ये आहे. त्यामुळे स्टॅननं या गिफ्टचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘तेरा घर जाएगा इसमें.’ स्टॅनची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, सानियानं स्टॅनला दिलेल्या गिफ्टची किंमत सुमारे 1.21 लाख असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या गिफ्टची किंमत ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत. तसंच सानिया आणि स्टॅनचं हे खास बाॅन्डिंग पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.