क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

शुभमन-चेतेश्वरच्या शतकी खेळीने; बांगलादेशसमोर 513 धावांचे तगडे आव्हान!

चितगाव : (Ind Vs Bang 1st Test Match 2022 3rd Day) भारताने चेतेश्वर पुजाराच्या शतकानंतर आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. आता बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे मोठे आव्हान आहे. भारताकडून शुभमन गिलने 110 धावांची तर चेतेश्वर पुजाराने नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली. तर विराट कोहली 19 धावा करून नाबाद राहिला.

केएल राहुल 23 धावा करून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. गिलने संधी मिळताच मोठे फटके मारत आपले शतक पूर्ण केले. गिलने 152 चेंडूत 110 धावा करून माघारी परतला. यानंतर पुजारने आपला गिअर बदलला आणि चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.

पुजाराने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करत 130 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पुजाराचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान ठेवले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये