संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक अटळ?
मुंबई : (Sanjay Raut for Arrest warrant) संजय राऊत-किरीट सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप यामुळं संजय राऊत यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, राऊत यांनी काही दिवसांपुर्वी मेधा सोमय्या यांच्यासोबत सोमय्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर मेधा यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात आता संजय राऊत यांच्यावर कांजूर पोलिसांकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
राऊत याच्या अडचणी मागच्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत. इकडं ईडीची कारवाई चालू असतानाच, आता दुसरं अरेस्ट वॉरंट कोर्टाने संजय राऊत यांना बजावलं आहे. मेधा सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना केलेल्या आरोपांबद्दल हा गुन्हा दाखल केला होता.