तुरुंगातून सुटल्यापेक्षा ‘या’ गोष्टीचा संजय राऊतांना जास्त आनंद, म्हणाले; “त्यांच जाणं हे…”

मुंबई : (Sanjay Raut On Amol Kirtikar) शिवसेना नेते अमोल किर्तीकर यांनी संजय राऊत यांची त्यांच्या मैत्री या निवासस्थानी जावून भेट घेतली. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला, पण अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केल्याने राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. राऊतांनी यावेळी म्हटलं आहे की, 100 दिवस तुरुंगात राहून सुटका झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षाही अधिक आनंद अमोल किर्तीकरांच्या शिवसेनेत राहण्याचा झाला आहे.
अमोल आज भेटायला आले, त्यांनी वडील गजानन किर्तीकर यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यांनी मात्र शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला, याचा आनंद तुरुंगातून सुटका होण्यापेक्षा अधिक आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात सोबत असलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत, असं सांगत राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमोल किर्तीकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘कालही मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेसाठी काम करत होतो, आजही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार आहे.’ गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणं आमच्यासाठी दुदैवी असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे